तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील माजी नगरसेवक राहुल खारोडे आत्महत्त्या प्रकरणी दि २८डिसेंबर च्या रात्री उशिरा चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तेल्हारा येथील माजी नगरसेवक राहुल खारोडे यांनी दि २६ डिसेंबर रोजी स्वतःच्या गायवाड्यात कापसाच्या गंजीवर टिनाच्या आळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी राहुल खारोडे यांचे वडिल पुंडलिक खारोडे यांनी दि २८ डिसेंबर रोजी लेखी तक्रार तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल केली .त्यामध्ये त्यांनी आरोपी यांनी संगनमत करून माझ्या मुलाला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिला होता. मानसिक त्रास देऊन माझा मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडले.त्याच्या आत्महत्या ला नमूद आरोपी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.यावरून संदीप मोरे ४५,वर्षा पवार ४२,कु.पूजा पवार २१,सौ माया संदीप मोरे ३६ रा तेल्हारा यांच्या विरुद्ध कलम ३०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय निलेश देशमुख करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola