तेल्हारा (कुशल भगत) : श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव याञा महोत्सवाच्या आधी वणीवारूळा मुंडगाव तेल्हारा रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी संस्थानच्या वतीने साव॔जनिक बांधकाम विभाग अकोट यांच्या कडे लेखी स्वरूपात दिली आहे. श्री गजानन महाराजांचा पवित्र चरण पादुका व काही काळ वास्तव्याने पुणीत झालेल्या श्री क्षेञ मुंडगाव येथे श्री गजानन महाराजांचा उपस्थित इ.स.1908 ला याञेची सुरूवात झाली होती ती प्रथा आजही सुरू आहे. दि 14जानेवारी 2019 ते 21 जानेवारी 2019 पर्यंतच्या या याञा महोत्सवात सातही दिवस महाप्रसाद व श्रीमद् कथाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला महाराष्ट्रासह इतर राज्यातुनही हजारो भक्त श्री गजानन महाराज पादुका संस्थान येथे येत असतात मुंडगांवला येणारया रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. रस्त्यांची अत्यंत दुर्दैशा झाली आहे. तरी ही भक्तांच्या सोई सुविधे करिता व भक्तांच्या भावणेचा आदर करून बांधकाम विभागाणे त्वरीत रस्त्याची दुरूस्ती व्हावी अशी मागणी भक्तांन कडून होत आहे.
अधिक वाचा : तेल्हारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola