अकोला :- मोर्णा महोत्सव फाउंडडेशन, अकोला व्दारा आयोजीत अकोला मोर्णा महोत्सव 2018 चे उद्घाटन ढोलताशाच्या गजरात शास्त्री स्टेडियम येथे करण्यात आले. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज फेम स्निग्धा देशमुख या 7 वी वर्गात शिकणा-या लहान मुलीच्या हस्ते हवेत तिरंगी बलुन सोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर, महानगरपालीकेचे आयुकत संजय कापडणीस, तत्कालीन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ,पद्मश्री कल्पना सरोज, मोर्णा महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक ढेरे, उपाध्यक्ष मधु जाधव, गजानन नारे,बाळापुरचे उप विभागीय अधिकारी संजय खडसे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
संकल्प प्रतिष्ठान यांच्या ढोल ताशा व ध्वज पथकाच्या गजरात मोर्णा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध शाळेतील विदयार्थी वेगवेगळया वेशभुषेत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अंधारे व श्रध्दा वरणकर यांनी केले. व उपस्थितांचे आभार मोर्णा महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक ढेरे यांनी मानले. यानंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर मान्यवर यांच्या हस्ते शास्त्री स्टेडियम येथे अकोला बुलढाणा फोटोग्राफर असोशिएशनच्या वतीने लावण्यात आलेल्या भव्य मोर्णा छायाचित्र प्रदर्शनिचे उद्घाटन करण्यात आले. मोर्णा स्वच्छता अभियानात विविध छायाचित्राकारांनी काढलेले सुमारे 54 उत्कृष्ठ छायाचित्राचे प्रदर्शन येथे करण्यात आले आहे.
मोर्णा स्वच्छता अभियानात विविध टप्प्यावरील सुंदर मनमोहक असे छायाचित्र लावण्यात आले आहे. अकोल्यातील जिल्हा माहिती कार्यालयातील टि.व्ही कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी काढलेल्या सुमारे 20 छायाचित्राचे स्वतंत्र दालन लावण्यात आले आहे.या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये प्रतिक्षा मानकर यांचे प्रथम क्रमांकाचे,अनुराग झुनझुनवाला यांचे व्दितीय क्रमांकाचे व शशिकांत शिरभाते यांचे तृतीय क्रमांकाचे आणि प्रदिप हुरपुडे यांचे उत्तेजनार्थ असलेले छायाचित्र आहेत.
यावेळी अकोला बुलढाणा फोटोग्राफर असोशिएशनचे अध्यक्ष अरंविद मानकर , सचिव किशोर पिपंळे, प्रकल्प प्रमुख संजय आगाशे, जगदीश झुनझुनवाला, कृष्णा चव्हाण व सुमित देशमुखसह असोशिएशनच्या पदाधिकारी यांची प्रमख उपस्थिती होती. 28,29 व 30 डिसेंबर 2018 रोजी या तीन दिवसात या महोत्सवा निमित्य विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे.संगीत ,नृत्यृ, नाटय, कला आणि युवा प्रेरणेसह लोक वर्गणीतुन एैतिहासिक लोकोत्सव होणार आहे.
29 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10 भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच पालकांसाठी संजीवनी क्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 1 महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात उद्योजक महिलांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सांयकाळी 7 वाजता सुरो के सरताज हा हिंदी व मराठी गितांचा रंगारंग कार्यक्रम होणार आहे. यात रोहीत राऊत , कृतिका बोरकर , रसिका बोरकर व सागर मधुमटके सहभागी होणार आहे .
30 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता योगाथॉन / बासरी वादन भक्ती संगीताचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता प्रा. निलेश जळंमकर दिग्दर्शीत महानाटय सहयाद्रीचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्णा गौरव दिंडीला उत्स्फुर्त प्रतिसाद पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवरून मोर्णा गौरव दिंडी काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मोर्णा गौरव रथाचे पुजन व हिरवी झेंडी दाखवून दिंडीची सुरूवात केली यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर, महानगरपालीकेचे आयुकत संजय कापडणीस, मोर्णा महोत्सव फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक ढेरे, उपाध्यक्ष मधु जाधव, गजानन नारे,बाळापुरचे उप विभागीय अधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीमध्ये विविध शाळेचे पथक सहभागी झाले होते.
दिंडीच्या पुढे संकल्प प्रतिष्ठान यांच्या ढोल ताशा व ध्वज पथक होते. त्यानंतर मोर्णा महोत्सवाचे झुल घातलेला हत्ती होता, मोर्णा गौरव रथ , लेझिम पथक, वाट चालली पंढरीला दर्शविणारे पथक , विविध रंगाचे ध्वज संचलन करणारे पथक तसेच जिजाऊ कन्या विदयालय, मुंगीलाल बाजोरीया विदयालय, न्यु इंग्लिश हायस्कुल, हिंदू ज्ञानपीठ, मनुताई कन्या शाळा, सन्मित्र पब्लिक स्कुल, भिकमचंद विदयालय, न्यु इंग्लिश हायस्कुल, विष्णुपंत खेडकर विदयालय, हनुमंत विदयालय, लिटील स्टार हायस्कुल, स्वावलंबी विदयालय, जागृती विदयालय, जि.प. हरिहर पेठ, जि.प. आगरकर व मोहरीदेवी खंडेलवाल विदयालय , डी.आर. पाटील विदयालय ,नवोदय विदयालय, प्रभात किड्स, सेन्ट ॲन्स कॉन्व्हेंट, आदी शाळेच्या विदयार्थी/विदयार्थींनी जोगवा , भारूड, अंधश्रध्दा निर्मुलन , वासुदेव आलारे , हम सब भारतीय है, गाडगेबाबा, महाराष्ट्राची लोकधारा,आदि विविध गुणदर्शनासह सहभागी झाले होते.
सदर दिंडीचा समारोप शास्त्री स्टेडियम येथे करण्यात आला. या दिंडीला शहरातील नागरीकांचा उर्त्स्फुत प्रतिसादर मिळाला. येणा-या जाणा-या प्रत्येक नगरवाशियांमध्ये दिंडीची भव्यता पाहून मोर्णा स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाल्याने त्यांचे ऊर भरून आले होते. संपुर्ण अकोला शहर मोर्णा मायच्या गौरवामुळे भारावून गेले असल्याचे दिसून आले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola