• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात समारोप

adil by adil
May 16, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 0
0
विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात समारोप
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :- येथील स्व. वसंत देसाई क्रीडांगणावर गुरुवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात समारोप झाला. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर , महसुल विभागाचे उपआयुक्त गजेंद्र बावणे, आदींसह उपायुक्त स्तरांचे अधिकारी, पाचही जिल्हयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होती.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेनुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या गेल्यात. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध व्यकतीगत व सांघिक खेळातील तसेच सांस्कृतिक स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. महसुल विभागाचा या वर्षीचा सर्व साधारण क्रीडा चषक यवतमाळ जिल्हयाने पटकाविला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सांस्कृतिक स्पर्धेत अकोला जिल्हयाचा प्रथम क्रमांक राहिला. व्यक्तीगत क्रिडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू बुलढाणाच्या उषा सोनोने, सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू बुलढाणाचा दिपक माघाडे यांची निवड करण्यात आली . या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागाला अनेक कामे करावे लागतात. या कामाच्या व्यापातून तणाव हलका होण्यासाठी अशा क्रिडा स्पर्धांची आवश्यकता असते. यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. असे सांगुन आयुक्त पुढे म्हणाले की, यापुढेही नागरीकांच्या समस्या व अडचणी महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत सोडवाव्यात व त्यांना आश्वस्त करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळापुरचे विभागीय अधिकारी यांनी केले.

रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न अकोला जिल्हा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम येथील स्व. वसंत देसाई क्रीडांगणावर झालेल्या विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप 27 डिसेंबर रोजी संपन्न झाला. त्यामध्ये अकोला, अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती अशा 6 संघाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये अकोला जिल्हा सर्वप्रथम तर यवतमाळ जिल्हा व्दितीय स्थानी राहीला तर अमरावती विभागाने तृतीय क्रमांक मिळवीला.

अकोला जिल्हयाच्यावतीने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी संजय खडसे, यांच्या दिग्दर्शनाखाली मोर्णाच्या तिरावरती हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये मोर्णा नदीवर आओ मिलकर हात बढाये हे सामुहिक गीत सादर करण्यात आले. नाटीका , मुकनाटीका, समुहनृत्य , गायन तसेच शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कुष्ठ दिग्दर्शन प्रथम संजय खडसे, उत्कृष्ट गायन व्दितीय संजय खडसे उत्कृष्ट अभिनय प्रथम राहुल तायडे व्दितीय संजय खडसे, उत्कृष्ठ अभिनय उमा गांवडे , व्दितीय वर्षा भुजाळे, उत्कृष्ठ वादक अरुण इंगळे ,उत्कृष्ट मुकनाटीका स्त्रीभ्रूण हत्या ,उत्कृष्ट वेशभुषा डॉ. निलेश अपार , उत्कृष्ठ संकल्पना ,सादरीकरण ,व गायन असे विविध पुरस्कार मिळवून अकोला जिल्हयाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून प्रा. संजय पाटील व संजय गवई यांनी काम पाहिले.

अधिक वाचा : मोर्णा महोत्सव व महाआरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akola news in MarathiSports
Previous Post

30 डिसेंबरला आयोजित महाआरोग्य अभियानासाठी यंत्रणा सज्ज शिबीराचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन

Next Post

मोर्णा सांस्कृतिक महोत्सवाचे ढोलताशाच्या गजरात उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मोर्णा सांस्कृतिक महोत्सवाचे ढोलताशाच्या गजरात उद्घाटन

मोर्णा सांस्कृतिक महोत्सवाचे ढोलताशाच्या गजरात उद्घाटन

ग्रामसभेत ग्रामपंचायत शिपायाचा आत्महत्येच्या प्रयत्न!

ग्रामसभेत ग्रामपंचायत शिपायाचा आत्महत्येच्या प्रयत्न!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.