मुंबई- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन नवीन वर्षाची भेट दिली आहे. मात्र, ग्राहकांकडून वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या नव्या निर्णयाला केबल व्यावसायिकांनी कडाडून विराेध केला आहे. ट्रायचे नवीन नियम ग्राहकांसाठी हिताचे ठरणारे नसल्याचा दावा करत राज्यातील सर्व केबल व्यावसायिकांनी गुरुवारी रात्री ७ ते १० दरम्यान केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गुरुवारी टीव्ही ठप्प राहणार आहेत.
दरम्यान, २९ डिसेंबरपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. ट्रायने जाहीर केलेली नियमावली ही ग्राहकांबराेबरच केबलचालक व्यवसायालाही जाचक ठरणारी असून त्याचा विराेध करण्यासाठी राज्यातील केबल व्यावसायिकांची बैठक बुधवारी मुंबईत झाली. या बैठकीमध्ये ट्रायच्या निर्णयाचा निषेध म्हणून तीन तास राज्यातील केबल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अाल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितले. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करता येण्यासाठी सर्व अधिकृत वाहिन्यांचे दर निश्चित करण्याच्या दृष्टीने येत्या २९ डिसेंबरपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण नव्या नियमांची अंमलबाजवणी करणार आहे.
ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार प्रसारण कंपन्यांना (ब्राॅडकास्टर्स) केबल ग्राहकांकडून महिन्याकाठी आलेल्या महिन्यापाेटीच्या भाड्यातून ८० टक्के रक्कम मिळणार असून उर्वरित २० टक्क्यांमधील केवळ १० टक्केच रक्कम केबल व्यावसायिकांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे ही नवी नियमावली याेग्य नसल्याचा दावा आंदाेलकांनी केला आहे. या आंदाेलनाचा एक भाग म्हणून स्टार वाहिनीच्या कंपनीवर शुक्रवारी माेर्चा काढण्यात येणार असून कंपनीच्या चॅनलचे बुके पॅकेज घेण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ट्राय हे परदेशी वाहिन्यांच्या हातातील बाहुले झाले असल्याचा गंभीर आरोप करून परब म्हणाले, हे नवीन नियम ग्राहक हिताचे नसून ग्राहकांच्या खिशाला आणखी भुर्दंड पाडणारे ठरणार आहे. ग्राहकांना ३५० रुपयांत ५०० चॅनल दिसत होते. मात्र, त्यासाठी आता ७०० रुपये मोजावे लागतील. त्यामुळे ट्रायचे हे धाेरण ग्राहक हिताचे नाही. केबल ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षरीत्या अधिक पैसे काढण्याचे काम उपग्रह वाहिन्या करत असल्याचा अाराेप केबल व्यावसायिकांनी केला.
अधिक वाचा : राफेल विमान प्रकरण : मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola