अकोला – निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करण्यासाठी आजपासून निवडणुक विभागाच्यावतीने जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आज प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी अकोट तालुक्यातील मोहळा, अंबोडा, अकोलखेड, तेल्हारा येथील न.प. शाळा 2, बाळापूर तालुक्यातील काझोखेड, जानोरी मेळ, मोखा, नागद, सागद, पातूर तालुक्यातील बेलुरा खु, दिग्रस खु, दिग्रस बु, मूर्तिजापूर तालुक्यातील रामखेड, आरखेड, बार्शीटाकळी तालुक्यतील धोटा, पारभवाळी, पिंपळगाव, अकोल्यातील मनपा मुलांची शाळा क्र. 18 येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यशिकासह मतदारांना माहिती दिली.
यावेळी स्वत: नागरिकांनी सदर यंत्रांचे प्रात्यक्षिक करुन पाहिले. त्यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रासोबत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हतेबाबत जिल्ह्यात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृती अभियानाचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे, त्याची प्रात्यक्षिके पाचही विधानसभा मतदारसंघात दि. 26 डिसेंबरपासून दाखवली जाणार आहेत. आज सदर गावांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत मतदारांना सविस्तर माहिती देण्यात आली.
अधिक वाचा : अकोल्यातील गुणवंत विद्यार्थिनीचा उपमहापौरांच्या हस्ते सत्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola