अकोला – दि. 28, 29 व 30 डिसेंबर 2018 रोजी शास्त्री स्टेडीयम येथे आयोजित मोर्णा महोत्सव व महाआरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज विविध यंत्रणांच्या प्रमुखांची शास्त्री स्टेडीयम येथे बैठक घेऊन उपस्थितांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी महोत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग, स्वच्छतागृह, अग्नीशमन वाहन, रुग्णवाहिका याबाबतची सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी शास्त्री स्टेडीयमच्या सर्व प्रवेशाव्दारांची पाहणी केली. प्रवेशाव्दाराला लागुन असलेल्या शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची सूचना त्यांनी केली. मनपाने तात्काळ अतिक्रमण हटविण्याची कार्यवाई केली.
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यास ते तात्काळ काढून टाकण्यात यावे, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. अनधिकृतरित्या उभे करण्यात आलेली वाहने तात्काळ हटविण्यास त्यांनी सांगितले. तसेच प्रवेशव्दाराचा रस्ता व्यवस्थित करण्याची सूचना केली. महोत्सव काळात नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू देऊ नये, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहण्यास त्यांनी सांगितले. स्टेडियमच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या भागाची यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. स्टेडियमच्या बाहय बाजुस असणाऱ्या सर्व दुकानदारांनी दुकानाच्या नावाचे फलेक्स व बोर्ड काढून टाकावेत, त्याऐवजी दुकानांची नावे पेन्टींग करुन घ्यावीत, अशी दुकानदारांना सूचना करुन उदया दुपारी 2.00 वाजेपर्यंत फलेक्स व बोर्ड काढण्यास सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभी मोर्णा महोत्सव व आरोग्य शिबीरासंदर्भात शास्त्री स्टेडीयम येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शासकीय वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हा शल्य चिकित्सत डॉ. आरती कुलवाल, तहसिलदार राहूल तायडे, जिल्हा खणीकर्म अधिकारी अतुल दौड, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, पोलीस निरीक्षक विलास पाटील, वैदयकीय अधीक्षक डॉ. श्यामकांत सिरसाम, मोर्णा महोत्सवाचे फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक ढेरे, गजानन नारे, मधु जाधव, डॉ. नरेश बजाज, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे, आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, तीन दिवस चालणाऱ्या मोर्णा महोत्सव काळात नागरिकांना कुठल्याही प्रकारची उणीव भासू देऊ नये. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे. निधीची अडचण भासू दिली जाणार नाही. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. नैसर्गिक आपत्ती विभागाचे साहय घेण्यात यावे. क्रीडांगणावर स्वच्छता ठेवावी. सर्व यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. महाआरोग्य शिबीराबाबत सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. औषधांचा तुटवडा भासू देऊ नये. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या सूचनेनुसार पत्रकार व त्यांच्या कुटंबियांच्या आरोग्य तपासणी करण्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्याची त्यांनी सूचना केली. मोर्णा महोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सर्व विभागांचा सहभाग राहण्याबाबत सूचना करताना ते म्हणाले की, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची जनमाणसांत प्रसिध्दी व्हावी यासाठी मनपा, पोलीस, आरोग्य, निवडणुक, परिवहन विभाग यांनी चित्ररथांचा समावेश करावा. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांच्या अडचणी जाणून घेतल्या. कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास मला सांगावे, असा दिलासाही त्यांनी सर्वांना दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्टेडियमच्या सर्व प्रवेशव्दारांची पाहणी केली.
प्रवेशव्दाराचा रस्ता व्यवस्थित करण्यास सांगितले. प्रवेशव्दारांच्या बाहेर उभी असलेली वाहने तात्काळ हटविण्याची सूचना त्यांनी केली. तसेच शासकीय जागेत असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याबाबत त्यांनी सूचित करुन कुणीही शासकीय जागेवर अतिक्रमण करु नये, असे अतिक्रमण आढळल्यास कुठलीही सूचना न देता तात्काळ काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. स्टेडियमच्या संपूर्ण बाहय भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. दुकानदारांनी दुकानाच्या नावाचे फलेक्स व बोर्ड उदया दुपारी 2.00 वाजेपर्यंत हटवून त्या ठिकाणी पेन्टींगने नाव टाकण्याचे त्यांनी सूचित केले. मोर्णा महोत्सवाबाबत दि. 27 डिसेंबर रोजी नियोजन भवनात बैठक मोर्णा महोत्सवाबाबत दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी 2.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, महाविदयालाचे प्राचार्य व ज्यांना महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सहभागी व्हायचे आहे, त्यांनी सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. बैठकीत मोर्णा महोत्सवाच्या उपक्रमांबाबत चर्चा केली जाणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola