दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर आज लॉंच करण्यात आला. वडाळ्यातील आयनॉक्स थिएटरमध्ये हा ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटातील ट्रेलरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचीही व्यक्तीरेखा दिसल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. बाळासाहेबांवरील चित्रपट साकारणं कठीण असून हा चित्रपट नसून शिवधनुष्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते निर्माते संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव आदींच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच करण्यात आला. ‘ठाकरे’ चित्रपटातील ट्रेलरमध्ये शिवसेनेची स्थापना, मराठीसाठीचे आंदोलन, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेली दंगल आदी विविध मुद्यांची झलक दिसली. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणे हे अधिक आव्हानात्मक होते. त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वातील पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याने सांगितले.
चित्रपटाच्या टीमने ही भूमिका साकारण्यासाठी आत्मविश्वास दिला असल्याचे नवाजुद्दीनने नमूद केले. तर, चित्रपटाची कथा समोर असल्यामुळे कलाकारांची निवड सहज करण्यात आली असल्याचे चित्रपटाचे निर्माते, लेखक-शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड अवघ्या दोन मिनिटात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री अमृता राव हिने मीनाताई ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.
अधिक वाचा : कंगना रणौत च्या ‘मणिकर्णिका…’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola