अकोला (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गानं अकोल्यात कत्तली करिता गोवंश आणल्या जात असल्याची माहिती पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे यांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी आज बाळापूर नाका येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाई दरम्यान, दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली, तसेच त्यांच्याकडून एक बुलेरो पिकअप मोटर वहनासह सात गौवंशांना ताब्यात घेण्यात आले. हे गोवंश अकोल्यातील गुल्लू नामक इसमाकडं आणल्या जात असल्याचं सांगण्यात येतंय. ही कारवाई आज गुरुवारी पाहटेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, पोलीस कर्मचारी प्रमोद डोईफोडे, अजय नागरे, शंकर डाबेराव यांनी केली.
अधिक वाचा : अकोल्यातील १९ वर्षीय युवक अचानक बेपत्ता,शोधकार्य सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola