अकोला : अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण पथकाने शहराच्या विविध भागातील अतिक्रमण काढले. मुख्य पोस्ट ऑफिस, सिव्हील लाईन चौक ते जवाहर नगर मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या टपऱ्या, ठेले, नाश्त्याच्या गाड्या, किरकोळ विक्रेत्यांच्या गाड्या हॉटेल, उपाहारगृहासमोरील अतिक्रमण तोडण्यात आले.
अतिक्रमण धारकांविरुद्ध मनपाच्या अतिक्रमण विभागाने कडक कारवाई करून परिसर अतिक्रमणमुक्त केला. या वेळी शहरातील सिटी कोतवाली ते बसस्टँड, गांधी चौकातील चौपाटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य मंदिर, न्यू क्लॉथ मार्केट, फतेह चौक तसेच टॉवर चौक ते जठारपेठ व मोठी उमरी परिसरात मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली.
कारवाईमध्ये रस्त्याच्या बाजूला वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई केली. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र धनबहादुर, सहायक अतिक्रमण अधिकारी नरेश बोरकर, बडोणे, सैय्यद रफीक, विनोद वानखेडे, शैलेंद्र गोपणारायण आदींनी केली.
अधिक वाचा : मनपाच्या जप्ती पथकाने केले दोन टॉवर आणि दुकान सील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola