अकोला : अकोल्यातील रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौक ते तेलीपुरा चौक या दरम्यान असलेली जीर्ण इमारत कोसळून एक महिला ठार झाली आहे. मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने इमारतीत राहणाऱ्या जानकी रामजी चोपडे यांच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे कुटुंबीय याच दुमजली इमारतीत राहतात. तिथेच त्यांचा क्लासही आहे.
रात्री नऊ वाजता जेवण आटोपल्यानंतर चोपडे कुटुंबीय घरात गप्पा मारत असताना अचानक ही इमारत कोसळली. या इमारतीखाली चोपडे कुटुंबातील कल्पना चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे आणि योगेश चोपडे हे चारही सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. बचाव पथकाने जानकीराम चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे, योगेश चोपडे यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले.
मात्र जानकीराम चोपडे यांच्या पत्नी कल्पना चोपडे यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तीन तासानंतर कल्पना चोपडे यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, ठाणेदार शेख, ठाणेदार विलास पाटील, ठाणेदार सपकाळ, सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, ठाणेदार अनिल चुंबळेस स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. सध्या या परिसरात जेसीबी मशीनच्या सहाय्याने या परिसरातील मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.
अधिक वाचा : मनपासह जिल्हा परिषद अधांतरी, मनपात 98 कोटींची कामे रखडणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola