जयपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०१९ मधील मोसमातील खेळाडूंचा मंगळवारी जयपूर येथे लिलाव झाला. त्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याच्यावर ८.४० कोटी रुपयांची बोली लावत त्याला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले आहे. त्यापाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू कार्लोस ब्राथवेट यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सने तर ब्राथवेटला कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आपल्या संघात सामावून घेतले आहे. इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने १.१० कोटी आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासाठी मुंबई इंडियन्सने २ कोटी रुपये मोजले आहेत.
वेस्ट इंडिजचा खेळाडू हेटमेयर याला खरेदी करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस होती. अखेर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४.२ कोटीला खरेदी केले. भारताचा कसोटीतील खेळाडू हनुमा विहारी याला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटींना घेतले आहे. वेस्ट इंडिजचा २३ वर्षीय यष्टिरक्षक निकोलस पुरन याला किंग्ज इलेव्हन पंजाबने ४.२० कोटी रुपयाची बोली लावून खरेदी केले. तर चेतेश्वर पुजारा, ब्रेंडॉन मॅककुलम, ख्रिस वोक्स यांची खरेदी झालेली नाही.
युवराजवर बोली लागलीच नाही
भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्यावर बोली लागलीच नाही. याआधीच्या एका मोसमात युवराज सिंग सर्वाधिक १६ कोटींची बोली लावली होती. त्याच्यावर आता २०१९ मधील मोसमासाठी १ कोटी बेस किंमत ठरली होती. मात्र, त्याला कोणीही खरेदी केले नाही.
अधिक वाचा : India vs Australia : दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा, अश्विन ला विश्रांती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola