अकोला: मतदार यादी शुद्धीकरण मोहीम अंतर्गत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज बाळापूर मतदार संघातील रिधोरा व व्याळा येथे मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची संयुक्त बैठक घेऊन मतदार यादी शुध्दीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) वैशाली देवकर आदी उपस्थित होते.
मतदार यादी अचूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विविध सूचना केल्या. मयत नावे, दुबार नावे, कायम स्थलांतरीत यांची नावे वगळणे, फोटो गोळा करणे, डिएसइ नोटीसवर कार्यवाही करणे, मयत व्यक्तीचे रजिस्टरच्या नोंदीनुसार नाव वगळणे तसेच मतदार यादीच्या प्रत्येक नोंदीची सर्व बीएलओ व बीएलए यांनी संयुक्त तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. निवडणुकीचे काम हे अत्यंत जबाबदारीचे असल्यामुळे या कामात कुठल्याही प्रकारे चुका होता कामा नये. निवडणुक विषयक कामे दक्षतेने करावे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी अकोला पश्चिम मतदार संघातील निवडणुक विषयक कामाचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित बीएलओ व बीएलए यांना मतदार यादीच्या शुध्दीकरणाबाबत सूचना केल्या.
अधिक वाचा : मनपासह जिल्हा परिषद अधांतरी, मनपात 98 कोटींची कामे रखडणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola