अकोला – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार १५ डिसेंबर रोजी संपुष्टात आला. तर दुसरीकडे अद्याप नव्या आयुक्तांची नियुक्ती झाली नाही. या प्रकारामुळे महापालिका पुन्हा एकदा पोरकी झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने हद्दवाढ झालेल्या भागासाठी नुकत्याच ९८ कोटी रुपयाच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व कामांचा निपटारा करण्यासाठी कायम स्वरूपी आयुक्तांची महापालिकेला गरज आहे.
मात्र असे होत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक त्रस्त झाले आहेत. दिवाळीपूर्वी पासून आयुक्त जितेंद्र वाघ वारंवार दीर्घ रजेवर जात आहेत. रजा संपल्या नंतर ते पुन्हा रजेत वाढ करीत आहेत. या वेळीही जितेंद्र वाघ १५ डिसेंबर पर्यंत रजेवर गेले होते. या दरम्यान आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता.
१५ डिसेंबरला सायंकाळ पर्यंत जितेंद्र वाघ यांनी रजेत वाढ केल्याची माहिती मनपाला मिळाली नव्हती. तर जिल्हाधिकाऱ्यांनाही आयुक्तपदाच्या प्रभारात वाढ झाल्याचे कळाले नाही. त्यामुळे १७ डिसेंबर पासून मनपा विना आयुक्ताने काम करीत आहे. यामुळे मनपा पोरकी झाली अाहे. विशेष म्हणजे हद्दवाढ झालेल्या भागात विविध विकास कामासाठी मनपाने ९८ कोटीच्या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत १५ कोटीच्या कामांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. यासह विविध कामांचे प्रस्ताव तयार करुन या कामांचे वर्क ऑर्डर लोकसभेची आचार संहिता लागू होण्यापूर्वी करण्याचा मनपातील पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी मनपाला कायमस्वरुपी आयुक्त मिळणे गरजेचे आहे. तसा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून होत असला तरी या प्रयत्नांना यश आलेले नाही.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या रजा काळात आयुक्तपदाचा प्रभार देण्यात आला आहे. तर आयुक्तांनी १५ डिसेंबर पर्यंत रजा नमूद केली आहे. पण त्यांनी रजेत वाढ केल्या जिल्हाधिकाऱ्यांकडेच आयुक्तपदाचा प्रभार राहणार आहे. त्यामुळे म्हटले तर महापालिकेला आयुक्त आहेत आणि नाही म्हटले तर नाही. मनपा क्षेत्रात दोन्ही आमदार भाजपचे तर पालकमंत्रीही भाजपचे आहेत. खासदारही भाजपचेच आहेत. असे असताना मनपाला भाजप राज्य शासनाच्या काळात कर्तव्यदक्ष अधिकारीच मिळालेले नाहीत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola