अकोला – होतकरु तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी शासन सातत्याने वेगवेगळया योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अनेक तरुण स्वयंपूर्ण झाले आहेत. प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान अंतर्गत अकोल्यातील दोन तरुण व एका महिलेने कुकचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा हॉटेल व्यवसाय थाटला आहे. नुकतेच जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या तरुणांच्या हॉटेलचे उदघाटन करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
अमोल भेंडारकर, किरण मानमोडे यांनी अकोल्यातील रणपिसे नगरमध्ये मास्टर चेफ तर नंदा जाधव यांनीही त्याच ठिकाणी एमएच-30 मांडा करी हाऊस या नावाने हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय थाटण्याचा विचार या तिघांच्याही मनात होता. पण यासाठी त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता होती. त्यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक द.ल. ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांना प्रशिक्षणाबाबतची माहिती मिळाली.
शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आदरतिथ्य या क्षेत्रातील कुक या मोडयुलचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. सदर योजने अंतर्गत अकोला शहरातील जसनागरा कॉलेज ऑफ स्कील डेव्हलपमेंट येथे या तिघांना चार महिन्यांचे कुकचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतल्यानंतर दुसऱ्या हॉटेलमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वत:चाच हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचे त्यांनी ठरविले. मग सुरु झाली जागेची शोधाशोध. योगायोगाने रणपिसेनगर येथील वर्दळ असणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी अमोल आणि किरणने भागीदारीत मास्टर चेफ तर नंदा यांनी एमएच-30 मांडा करी हाऊस सुरु करण्याचे ठरविले. सर्व जुळवाजुळव झाल्यानंतर भाडयाच्या जागेत त्यांनी हॉटेल सुरु केले. दि. 15 डिसेंबर रोजी स्वत: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी हॉटेलचे उदघाटन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. ठाकरे, जसनागराच्या संचालिका अमृता नागरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिक वाचा : शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी -महापौर विजय अग्रवाल यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola