तेल्हारा – संत नगरी मुंडगाव ता, अकोट येथे दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजी तेल्हारा व अकोट बेलदार समाजाच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधन व गुणवंत विध्यार्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रामुख्याने सर्व पक्षाचे आमदार आजी माजी नेते मंडळी एकाच मंचा वर येऊन बेलदार समाजाच्या हितासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले परंतु या कार्यक्रमात ज्यांच्या मतदात संघात कार्यक्रम होता त्याच अकोट विधानसभेचे आमद भारसाकडे यांनी मात्र पाठ फिरवली ह्या कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांची सम्पूर्ण महाराष्ट्रातून उपस्थिती होती यावेळी समाजातील गुणवंत विध्यार्थांचा सत्कार करण्यात आला तर समाजा करिता अथक प्रयत्न करत असलेले सरीशे सरांचा वाढदिवस समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला तर लक्ष्मीबाई सरीशे यांनी भारिप बमस मध्ये प्रवेश केल्याने त्यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला ह्या कार्यक्रमात सर्व समाज बांधवानी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
अधिक वाचा : भरल्या जखमेसह विधवेचे कलेक्ट्रेटवर उपोषण; 17 जणांनी केली मारहाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola