अकोला (प्रतिनिधी) : अवैध दारू विक्री करून घराजवळ राहणाऱ्या १० वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक केल्यामुळे तणाव निर्माण होण्याचा अनर्थ टळला.
आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढल्याची माहिती मिळाली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिवनी परिसरात शेख नजीर खा नाजीम खा पठाण हा २८ वर्षीय युवक अवैधरित्या दारू विक्री करतो. १० वर्षाची अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असल्याचे पाहून शेख नजीर याने तीला जवळ बोलावले. तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार परिसरातील नागरिकांनी पाहीला आणि त्यांनी आरडाओरड केली. यानंतर शेख नजीर खा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु परिसरातील नागरिकांनी त्याला थांबवले आणि त्याची विचारपूस केली. तोपर्यंत एका महिलेने या संदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घडलेला फ्रकार मुलीच्या आईला सांगण्यात आला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक हे एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी शेख नजीर खा विरोधात कारवाईची मागणी केली. एमआयडीसी पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तत्परता दाखवली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शेख नाजीर खाला अटक केली. त्यांच्या तत्परतेमुळे नागरिकांचा रोष शांत झाला. दरम्यान, शेख नजीर खा याच्यावर याआधी अवैधरित्या दारू विक्री केल्याची कारवाई झाली असल्याचे समजते.
अधिक वाचा : पातूर शहरात 2 सोन्याच्या दुकानात शटर तोडून चोरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola