सारा अली खान व रणवीर सिंग चा बहुप्रतिक्षीत चित्रपट सिम्बा चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ‘तेरे बिन’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत. हे रोमॅन्टिक गाणे पाहून तुम्ही साराचा नुकताच रिलीज झालेला ‘केदारनाथ’ विसरून जाल.
गाण्यात साराचा सिंपल आणि देसी लूक राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष्क बागची यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल लिहिले आहेत रश्मी विरागने आणि ते संगीतबद्ध केले आहे, तनिष्क बागचीने. धर्मा प्रॉडक्शन व रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा सिनेमा येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
यापूर्वी रिलीज झालेले या चित्रपटाचे ‘आंख मारे’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आहे. हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे…’ चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे. ‘आंख मारे और लडकी आंख मारे…’ हे ओरिजनल गाणे कुमार सानू यांनी गायले होते.
‘सिम्बा’हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीर पहिल्यांदा पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे.
अधिक वाचा : ‘सोन चिडियाँ’चे फर्स्ट पोस्टर , टीझर प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola