अकोला (प्रतिनिधी) : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भटे क्लब समोरून जात असलेल्या ३ व्यक्ती जवळ दारूचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. याच बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या टीम ने सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या असता त्याचा जवळ देशी विदेशी दारू चे तब्बल ८६४ बाटल्या दारू हस्तगत करण्यात आली. याची किंमत ६५५२० असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी अकोल्यातील असून दोन आरोपी चंद्रपूर मधले आहे.
हि दारू हे आरोपी दारू बंदी असलेल्या चंद्रपूर मध्ये नेत असल्याची माहिती पूढे येत आहे. सदर ची कारवाई पुलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पुलिक अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख यांच्या आदेशाखाली ए एस आई दिनकर बुंदे, अश्विन सिरसाट, आशिष ठाकूर, संदीप तवाडे, चालक अनिल राठोर यांनी केली.
अधिक वाचा : तेल्हाऱ्यात गुन्हेगारीने काढले डोके वर,लोखंडी रॉड मारून केले युवकाला गंभीर जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola