अकोला (प्रतिनिधी) : वेतनातील अनियमितता दूर करून गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेले कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन अदा करण्यात पुढाकार घेऊन ही समस्या कायमची सोडविल्याबद्दल महापौर विजय अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.
वेतनातील अनियमिततेमुळे मनपा कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. कर्मचाऱ्यांच्या समस्येची जाण ठेवून ते त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि निधीची तरतूद करून कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत पेन्शन अदा करण्यात महापौर विजय अग्रवाल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्याबद्दल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने महापौर दालनात महापौर विजय अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांचे आभार मानण्यात आले. सत्काराला उत्तर देताना महापौर विजय अग्रवाल म्हणाले,मनपा कर्मचाऱ्यांना बँकेकडून कमी व्याज दराने कर्ज मिळावे या बद्दल बँक व्यवस्थापक यांच्यासोबत बोलणे झाले आहे. सफाई कामगारांना निवास उपलब्ध व्हावे या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत तसेच शासनाच्या धोरणानुसार घरकुल उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासंबधी संबंधित विभाग प्मुखांना सर्वे करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अकोला मनपा मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त्या २००८ पासून प्रलंबित आहेत. त्या प्रकरणासंबंधी देखिल मंत्रालयात चर्चा करून नियुक्त्या दिल्या जातील, असेही या वेळी महापौर विजय अग्रवाल यांनी जाहीर केले.
सर्व समस्या निकाली काढल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले. यावेळी नागर सचिव अनिल बिडवे, पी. बी. भातकुले, अनुप खरारे, शांताराम निधाने, विजय सारवान,मदन धनजे, बबलू सारवान, अविनाश पथरोड, राजू थामेत, विजय गोडाले, भारत गोडाले, जोगेंद्र खरारे, राजू गोहर आदींची उपस्थिती होती.
अधिक वाचा : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोल्यात 30 व 31 डिसेंबरला महाआरोग्य अभियान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola