पुणे : छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होणार हे आम्हाला आधीच माहिती होतं, परंतु, मध्य प्रदेशातील निकाल हा आमच्यासाठी आश्यर्यकारक आहे, असे भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.
छत्तीसगडचा गड भाजपला राखता आला नाही. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर भाजपने गड गमावला असून त्यांना अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. या निवडणुकीत मायावती यांच्या बसपाला ६ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. भाजपचा पराभव झाल्यानंतर माध्यमांशी बोलतना संजय काकडे म्हणाले, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला पराभव सहन करावा लागणार हे आम्हाला आधीच माहिती झाले होते. परंतु, मध्य प्रदेशात काँग्रेसला जे यश मिळाले ते आमच्यासाठी आश्चर्यकारक असेच आहे. भाजपाने विकासाऐवाजी राम मंदिर, पुतळ्यावर अधिक लक्ष दिल्याने भाजपच्या पदरी निराशा आली आहे, असेही काकडे म्हणाले.
अधिक वाचा : उपेंद्र कुशवाह यांचा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola