श्रीनगर : दक्षिणी काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील झैनापोरा परिसरात दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन पोलीस ठार झाले आहेत तर एक जखमी झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या छावण्यांवर दहशतवाद्यांनी आधी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे छावण्यांत पुरता गोंधळ उडाला आणि त्यात तीन सुरक्षा रक्षकांचा -जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसांना उपचारांसाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अद्याप या परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. दहशतावाद्यांनी या हल्ल्यात वापरलेल्या 4 सर्व्हिस रायफल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक नागरिकांच्या संरक्षणासाठी या पोलीस छावण्यात तैणात करण्यात आल्या होत्या. त्यावरच दहशवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात जोरदार शोधमोहिम सुरू केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा : भगत सिंग यांना दहशतवादी म्हणणाऱ्या प्राध्यापकला विद्यापीठानं केले निलंबित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1