अकोला (प्रतिनिधी) : अकोला पोलीस दला तर्फे महिला व विध्यार्थी सुरक्षा या विषयावर जनजगृती व्हावी या करिता जिल्हाभर जननी 2 हा उपक्रम राबविण्यात आला होता त्या उपक्रमा अंतर्गत समाजातील काही नेतृत्व गुण असलेल्या महिलांना 3 दिवसीय कायदे विषयक प्रशिक्षण देऊन त्यांची S W A S(soldier For women and safety) “महिला सुरक्षा रक्षक” ,ही टीम म पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांचे संकल्पनेतून तयार करण्यात आली.
ह्या टीमने प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन कायदे विषयक मार्गदर्शन केले. आज पावेतो 419 कार्यशाळा घेण्यात आल्या व जननी2 उपक्रमा नंतर ग्रामीण भागात 127 कार्यशाळा घेऊन 80 हजार विधर्थींना कायदे प्रति सजग करण्यात आले.
जननी2 उपक्रम हा तळागाळातील लोकां पर्यंत जावा असा मानस मा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांचा आहे त्या साठी अजून काय उपाय योजना करता येथील या साठी आज पोलीस मुख्यालय मनोरंज हॉल येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री विक्रांत देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले जास्तीत जास्त जन जागृती कशी करता येईल ह्या वर भर दिला, उपविभागीय पोलीस अधिकारीश्री उमेश माने पाटील ह्यांनी ह्या उपक्रमास सुभेच्या देत आपण सर्व मिळून प्रयन्त करूया असे सुचविले, तसेच म पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यानी झालेल्या कार्याचा आढावा घेतला त्यामध्ये समाधान व्यक्त करत अजून काय काय उपाय योजना करता येतील ह्या सबंधा ने सखोल मार्गदर्शन केले स्वास टीम सोबत आपले अनुभव शेअर केले काही समस्या जाणून घेत त्यावर तोडगा सुद्धा काढत अकोला पोलिस दलाच्या ह्या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले.
आढावा बैठकीला डॉ मानसा कलासागर ,परिविक्षाधीन पोलिस अधिकारी श्री डॉ निलेश देशमुख ,पोलिस निरीक्षक विलास पाटील , राखीव पोलीस निरीक्षक तिडके,पो उप नि वाघ मॅडम तसेच पो का गोपाल मुकुंदे,विशाल मोरे तसेच स्वास टीम चे सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा : अपंग समन्वय कृती समिती द्वारे दीपक रेळे यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola