देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा जोधपूर येथील उमेद भवनामध्ये भव्यदिव्य विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या या जंगी विवाहानंतर त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षावही झाला. मात्र, तिच्या लग्नात प्राण्यांचा वापर केला गेल्यामुळे ‘पेटा’ या प्राणी सुरक्षा संस्थेने तिव्र नाराजी व्यक्त केली. ‘पेटा’ (PETA)ने याबाबत प्रियांका आणि निकला उद्देशून एक ट्विट केले आहे.
प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आला. यासंबंधी ‘पेटा’ने त्यांच्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लग्नात प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारचे साधन वापरले जातात. त्यामुळे त्यांना कसा त्रास होतो, हे दाखवण्यात आले आहे. ‘तुम्हाला जरी तुमच्या लग्नाचा आनंद असेल, मात्र प्राण्यांसाठी हा दिवस नक्कीच चांगला नाही‘, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
Dear @priyankachopra and @nickjonas. Eles 4 weddings live n chains & horses r controlled w whips, spiked bits. Ppl r rejecting ele rides: https://t.co/Gea5jvP6LP & having horse-free weddings. Congrats, but we regret it was not a happy day for animals. pic.twitter.com/p9FFeJ969B
— PETA India ❤️❤️ (@PetaIndia) December 3, 2018
प्रियांका आणि निकच्या लग्नात फटाक्यांची आतिषबाजी केल्याप्रकरणी देखील त्यांचा विवाह सोहळा वादात अडकला होता. त्यानंतर माध्यमांचे प्रतिनीधी आणि लग्नसोहळ्यातील सुरक्षा रक्षक यांच्यातही वाद निर्माण झाल्याने प्रियांकाच्या लग्नाला गालबोट लागले होते. आता ‘पेटा’ने केलेल्या या ट्विटवर प्रियांका आणि निक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अधिक वाचा : ‘दीपवीर’ वर शीख समुदाय नाराज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola