उदयपूर : राजस्थानातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?‘ असा सवाल त्यांनी यावेळी केला. मोदी हे हिंदू असले तरी, त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहिती नाही, तसेत गीतेत काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत नाही.
राहुल गांधी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. उदयपूर येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. सर्जिकल स्ट्राईक हा सैन्याने केला होता, त्याचे श्रेयही मोदींनी घेतले. तसेच मनमोहन सिंग यांच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले होते, पण त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना याबाबतची गोपनियता ठेवण्याबाबत विनंती केली होती. मोदींनी अशी कोणतीही गोपनियता न ठेवता सैन्याच्या निर्णयात हस्तक्षेप केला व या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा कसा होईल हे बघितले, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, तोही सर्व मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद करून घेतला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान झाले आहे, असे मत गांधी यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना व्यक्त केले.
अधिक वाचा : भा.ज.पा.नेच केला होता राम मंदिराच्या अध्यादेशाला विरोध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola