भारताचा ऑलिम्पिक सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा ने आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या खेळाडू समितीचा कार्याध्यक्ष म्हणून दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल त्याचा नेमबाजीतील सर्वोच्च अशा ‘ब्लू क्रॉस‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
३६ वर्षीय अभिनवने हा पुरस्कार जर्मनीत स्वीकारला. त्यानंतर ट्विटरवर त्याने आभारही मानले. म्युनिकमध्ये आपल्याला नेमबाजीतील ब्लू क्रॉस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. अभिनवने अमेरिकेचे प्रख्यात नेमबाज किम्बर्ली ऱ्होड यांच्यानंतर खेळाडूंच्या समितीचे कार्याध्यक्षपद स्वीकारले.
Extremely humbled to receive the @ISSF_Shooting ‘s highest honour the Blue Cross at the General Assembly in Munich today. pic.twitter.com/pNNgQWxT5L
— Abhinav Bindra OLY (@Abhinav_Bindra) November 30, 2018
२००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनवने भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर तो नेमबाजी फेडरेशनच्या खेळाडू समितीचा २०१० ते २०१४ या कालावधीत सदस्य होता आणि २०१४ ते २०१८ या कालावधीत त्याने कार्याध्यक्षपद भूषविले. खेळाडू म्हणून केलेल्या दिमाखदार कामगिरीबद्दल २०१६मध्ये त्याला प्रेसिडेन्ट बटन व डिप्लोम ऑफ ऑनर हा किताबही देण्यात आला होता. त्याच्या कार्यकाळात खेळाडूंना सर्वसमावेशक असे माहितीपुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. राष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनचे अध्यक्ष राणिंदर सिंग यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यांना सुवर्णपदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.
अधिक वाचा : ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola