दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहूप्रतिक्षीत २.० हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी उत्सवच. चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हिच क्रेझ चित्रपटगृहातही पाहायला मिळाली. एका चित्रपटगृहात ‘२.०’ तील रजनीकांतची एन्ट्री चाहत्यांनी धुमधडाक्यात साजरी केली. त्याच्या एन्ट्रीवर नाचण्याकरिता चित्रपट चक्क ३ मिनिटे थांबविण्यात आला होता.
सोशल मीडियावर चाहत्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या इच्छेखातर चित्रपट पॉज होणारा ‘२.०‘ हा कदाचित पहिलाच असेल. यावरुनच चाहत्यांमध्ये रजनीकांतची असलेली प्रतिमा आणि त्याच्यावर असलेले चाहत्यांचे प्रेम याचा अंदाज येतो.
The movie has been paused for 3 minutes. Thalaiva’s first look in the movie is being celebrated in style? #2Point0 #2Point0FDFS !!@RIAZtheboss @aditi1231@LMKMovieManiac @resulp@shankarshanmugh @iamAmyJackson @anirudhofficial@LycaProductions pic.twitter.com/VD3EEmb5H0
— Rajinikanth Fans 2.0 (@RajiniFansTeam) November 29, 2018
‘२.०’ बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. आठवड्याच्या शेवटी देखील हा चित्रपट बक्कळ कमाई करेल, असा अंदाज चित्रपट समीक्षक व्यक्त करत आहेत. यावर्षीचा हा सर्वात महागडा चित्रपट मानला जातोय. आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे कोणते नवे रेकॉर्ड तयार करतो, हे पाहणे रंजक ठरेल.
अधिक वाचा : थरकाप उडवणारा ‘अमावस’ या चित्रपटाचा टीझर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा –