अकोला (प्रतिनिधी) : स्थानिक सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय सेवा योजना तर्फे अभिवादन व आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता जयप्रकाश राठी हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डि सिकची होते. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ प्रसन्नजीत गवई व डॉ छाया घड्याळजी यांनी केले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील डॉ विद्या राऊत यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांनी स्त्री शिक्षणा साठी केलेल्या कार्याची माहीती देउन समस्त स्त्रीयांनी महात्मा ज्योतीबा फुले यांना नतमस्तक व्हावे असे प्रतीपादन केले. याप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ दिनकर उंबरकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ रतन राठोड, मराठी विभाग प्रमुख प्रा भास्कर धारणे, ईंग्रजी विभाग प्रमुख प्रा राजु रणपिसे, संगीत विभाग प्रमुख प्रा. अनिरुद्ध खरे, महाविद्यालयाचे अधीक्षक नीलकंठ ईंगळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ स्नेहल शेंबेकर, डॉ भारती पटनायक, ग्रंथपाल डॉ अशोक सोनोने, डॉ कौमुदी बर्डे, डॉ कैलास वानखडे, प्रा बैस, प्रा. हरिचंद नरेटी, डॉ गोविंद एललकर, डॉ निरज लांडे, डॉ बाळासाहेब जोगदंड, प्रा अमोल गावंडे, प्रा. सुनीता डाबेराव, प्रा सुनीता बन्ने, प्रा कुलकर्णी, प्रा दिलिप कुमरे, डॉ नितीन चौधरी, प्रा. मनीषा पेठे, प्रा वेदांजली काळे, प्रा. बजाज मॅडम, प्रा कु. सोने, प्रा. राउत मॅडम, नाना खोले, कैलास अमृतकर, गणेशभाउ, श्री. पागळे, किरण पाटेखेडे, गजानन कळंबे, आश्विन, शुभम पोळ, सागरभाउ, विजय यांच्या सहीत रासेयो चे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रसन्नजीत गवई यांनी तर आभार डॉ स्नेहल शेंबेकर यांनी मानले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola