• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीएसआय, एएसआय, पोलिस ‘एसीबी’च्या जाळ्यात; मागितली दहा हजारांची लाच

adil by adil
May 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
पीएसआय, एएसआय, पोलिस ‘एसीबी’च्या जाळ्यात; मागितली दहा हजारांची लाच
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शैलेश सुरेश मस्के, त्याचा रायटर एएसआय राजेश धैर्यशील शेंडे यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांना सापळ्याची चाहूल लागताच त्यांनी तक्रारदाराची अंगझडती घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा कारवाईसाठी दिलेले व्हाईस रेकॉर्डरमधील मेमरी कार्ड काढून फेकले व तक्रारदारास मारहाण केली. या प्रकरणी एसीबीने मंगळवारी पीएसआयसह रायटर व त्यांना मदत करणाऱ्या शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही आरोपी फरार झाले आहेत.

कारंजा येथील ऋषिकेश नावाच्या एका व्यक्तीला कारंजा बायपास येथे काही महिन्यापूर्वी एक मोबाइल सापडला. २००-३०० रुपये खर्च करून त्यांनी तो मोबाइल दुरुस्त केला व तो मोबाइल त्यांची पत्नी वापरू लागली. मात्र याच मोबाइल चोरीची तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात असल्याने ट्रेसिंगमध्ये या मोबाइलचे लोकेशन कारंजा येथे ऋषिकेश यांच्या पत्नीच्या नावाने आले. त्यानुसार सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश शेंडे (पीएसआय शैलेश मस्के याचा रायटर) याने ऋषिकेश यांना फोन केला व तुमच्याकडे असलेला मोबाइल चोरीचा आहे. म्हणून त्यांना सिटी कोतवाली ठाण्यात बोलावले. तेथे शेंडे याने पीएसआय शैलेश मस्केची ओळख करून दिली. या दोघांनी ऋषिकेश यांनी अकोला रेल्वे स्थानकावरून मोबाइल चोरला असे धाकदपटशा करून त्यांच्यावर दबाव निर्माण केला व कारवाई टाळायची असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले व पुन्हा पैसे घेऊन येण्याचे सांगून पाठवून दिले. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने १७ नोव्हेंबरला एसीबीकडे तक्रार केली. त्यावरून एसीबीने २२ नोव्हेंबरला पडताळणी सापळा रचला. या वेळी एसीबीने ऋषिकेश यांच्याकडे एक डिजिटल व्हाइस रेकॉर्डर दिले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

ठरल्याप्रमाणे पंचाला घेऊन ऋषिकेश सिटी कोतवालीत गेले. तेथे पीएसआय मस्के, एएसआय शेंडे व ऋषिकेश तिघेही पोलिस ठाण्याजवळील चहाच्या कॅन्टीनवर गेले. तेथे चोरीची तक्रार दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी शेंडे याने केली. तडजोड सहा हजरावर आली. त्याला पीएसआय मस्के याने दुजोरा दिला.

तिघांत संभाषण सुरु असताना पीएसआय मस्केला संशय आल्याने त्याने ऋषिकेशच्या खिशातील मोबाइल व व्हाइस रेकॉर्डर हिसकले. तर शेंडे याने त्यांची कॉलर पकडून पोलिस ठाण्यात नेले. तेथे अंगझडती घेऊन नग्न केले व शिवीगाळ केली. इतक्यात एका पोलिसाने डिजिटल व्हाइस रेकॉर्डरमधील सॅन्डीक्स कंपनीचे आठ जीबी मेमरी कार्ड काढून घेतले व थोड्या वेळा दुसरे मेमरी कार्ड आणून त्यात टाकले. काही वेळानंतर तक्रारदारास सोडून दिले. तक्रारदार व पंच थेट एसीबी कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी आपबीती सांगितली. त्यावरून मंगळवारी एसीबीने पीएसआय शैलेश सुरेश मस्के, एएएसआय राजेश धैर्यशील शेंडे व एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७ अ, ३९२,२०१, ३४२, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, गजानन दामोदर व सुनील राऊत यांनी केली.पीएसआय शैलेश मस्के पीएसआय, एएसआय, पोलिस ‘एसीबी’च्या जाळ्यात; मागितली दहा हजारांची लाच शहर कोतवाली पोलिस ठाणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले पैसे.

पीएसआय मस्के व शेंडे यांच्या मदतीला धावून येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच डिजिटल व्हाइस रेकॉर्डरमधील मेमेरी कार्ड बदलवले व दोघांना मदत केली. त्यानंतर तक्रारदारास शिवीगाळ करून नग्न ठेवले. हा पोलिस कर्मचारी कोण, अशी चर्चा पोलिस वर्तुळात आहे. या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन लवकरच एसीबी त्याला बेड्या ठोकणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातून गायब झाले होते.

अधिक वाचा : अवैधपणे रेती वाहतूक करणारे वाहन जप्त,उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

सिंचन घोटाळ्याला मा.मुख्यमंत्री अजित पवार जबाबदार

Next Post

पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग; सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग; सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका

पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग; सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका

सीताबाई महाविद्यालयात रासेयो तर्फे महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.