नवी दिल्ली : भारताची महिला क्रिकेटची माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू मिताली राज ने टीमचे प्रशिक्षक रमेश पोवारवर अपमानित केल्याचा आरोप केला आहे. तसेच बीसीसीआयच्या प्रशासक समितीची सदस्य डायना इदुल्जीवर भेदभाव केल्याचाही आरोप केला आहे.
दरम्यान, प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्य आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार डियाना इदुलजींया मते, सीओए मिताली राजच्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. डियाना या सीओएच्या दोन सदस्य समितीच्या सदस्य आहेत. त्यांच्या मते, समिती कोणत्याही क्रिकेटच्या निर्णयांचं ओझं घेऊ शकत नाही.
महिला वर्ल्डकप टी२० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मितालीला बाहेर बसवण्यात आले होते. हा सामना भारत हरला होता. त्यामुळे वर्ल्डकपमधूनही भारताला बाहेर पडावं लागलं होतं. अनुभवी खेळाडूला महत्त्वपूर्ण सामन्यात बाहेर बसवणं योग्य आहे का या प्रश्नावरून वाद सुरू झाला होता. आता या वादाने रौद्र रूप घेतलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली बाहेर बसली होती. मात्र त्याआधी खेळण्यात आलेल्या दोन्ही सामन्यात मितालीने अर्धशतकी खेळी खेळली होती. उपांत्य सामन्याच्या एकदिवसआधी ती पूर्ण फिट असल्याचे सांगण्यात आले होते. असे असूनही मॅनेजमेंटने तिला संघाबाहेर ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकणाऱ्या संपूर्ण संघालाच पुन्हा एकदा प्राधान्य दिले.
यावर इदुलजी म्हणाल्या की, ‘सीओए या प्रकरणात स्वतःहून पडणार नाही. आम्ही क्रिकेटच्या मुद्यांमध्ये कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. प्लेईंग ११ मध्ये कोणी खेळावं हा आमचा निर्णय नाही आणि हा निर्णय दुसऱ्या कोणाचाही नाही. मॅनेजमेंटने याचा निर्णय घ्यावा. मॅनेजमेंटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचं काम सीओएचं नाही.’
अधिक वाचा : टी-२० मध्ये मिताली राजच्या सर्वाधिक धावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola