अकोला (शब्बीर खान) : मोठी उमरी परिसरातील देशी दारूच्या दुकानात मजुरीने काम करणाऱ्या युवकाला किरकोळ वादातून एका ग्राहकाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली. या युवकाचा उपचारादरम्यान मृत्य झाला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी परिसरातील देशी दारूच्या दुकानात गुरुवारी, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रणजित तुकाराम वाघ नामक व्यक्ती दारू पिण्यासाठी आला होता. यावेळी त्यांचा या दुकानात मजुरीने काम करणाऱ्या युवकासोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर रणजित वाघ याने जवळील चाकूने त्या युवकावर सपासप वार केले. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. श्रीकांत सोनूकले, लहान उमरी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर मारेकरी रणजित वाघ हा घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी युवकाला उपचारार्थ शासकीय रुणालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी रणजित वाघ विरूध्द गुन्हा दाखल करून शोध मोहिम राबविली. दरम्यान, उपचारार्थ असलेल्या श्रीकांत सोनूकले याचा दुपारच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
हल्लेखोरास एका तासात अटक या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत हल्लेखोराविरूध्द शोध मोहिम राबविली. सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी कर्मचारी सत्यजित ठाकुर, सचिन दांदळे, रमाकांत दिक्षीत यांनी एका तासाच्या आत हल्लेखोरास अटक केली आहे. भरदिवसा मोठी उमरी परिसरात झालेल्या या हल्ल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेने कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola