नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सचिवालयात आज मिरचीपूड फेकून हल्ला करण्याची घटना घडली आहे. या हल्ल्यावेळी फेकलेली मिरचीपूड त्यांच्या डोळ्यात गेल्याचे वृत्त आहे.अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सचिवालयात धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला. यावेळी केजरीवाल यांचा चष्मा तुटला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी केजरीवाल आपल्या चेंबरमधून बाहेर पडत होते, त्याचवेळी त्यांच्यावर मिरचीपूड फेकण्याचा प्रकार घडला आहे. चेंबरच्या बाहेर एक व्यक्ती उभा होता. त्याने आगपेटीच्या डबीतून मिरचीपूड आणली होती. केजरीवाल चेंबरमधून बाहेर आल्यानंतर त्याने त्यांच्यावर मिरचीपूड फेकली.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अनिल कुमार शर्मा नावाच्या युवकाला अटक केली आहे. त्याला इंद्रप्रस्थ पोलिस स्थानकात नेण्यात आले आहे.आम आदमी पक्षाने (आप) मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. आपने दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, मुख्यमंत्री दिल्लीत सुरक्षित नाहीत, असे ट्वीट केले आहे. याआधीही केजरीवाल यांच्या एका महिलेने शाही फेकली होती. तर एका रॅली दरम्यान रिक्षा चालकाने केजरीवाल यांना श्रीमुखात मारली होती.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपनेही निषेध केला आहे. भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे की लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ज्याने मिरचीपूड फेकली आहे. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
अधिक वाचा : लोकसभा २०१९ निवडणूक लढणार नाही: सुषमा स्वराज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola