अकोला (शब्बीर खान): ईद मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे या दिवशी अकोला सह देशभरात दारुबंदी करण्यात यावी या मागणी चे निवेदन सुन्नी यूथ फोर्स अकोला यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना दिले आहे. येत्या २१ नोव्हेंबर बुधवारला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन आहे . विश्वात अल्लाह चे मानवी दूत म्हणूनमहंमद पैगंबर विश्वात पाठविण्यात आले होते. विश्वातील सर्व खराबी संपविण्याचा त्यांना अल्लाह ने संदेश दिला होता. सर्व वाईट कामांची जननी दारू आहे. दारूमुळे अनेक गुन्हे घडत असतात. त्यामुळे ही दारू महंमद पैगंबर जन्मदिन ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने या दिवशी संपूर्ण देशातदारू बंद करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना सुन्नी यूथ फोर्स ने निवेदन देऊन केली आहे. निवेदन सादर करतांना सुन्नी यूथ फोर्स चे अकोला जिल्हाध्यक्ष शाहिद इकबाल रज्वी, नासिर खान शहर अध्यक्ष ,गुड्डू मेमन जिला सचिव ,इमरान चौहान शहर सचिव , वसीम जमाली सैयद अकरम फरीद शाह गुलाम नबी सैयद करीम जानी सैयद मुदस्सीर शेख यूसुफ मुजाहिद उर्फ मुज्ज शाह अब्दुल करीम अब्दुल रशीद आफताब खान राजू खान जुनैद खान शम्स तबरेज अयूब रब्बानी हाजी मुदहाम समीर ,मौलाना सैयद शाहनवाज मौलाना गुलाम मुस्तफा साहब मुफ्ती गुफरान हाफिज मकसूद हाफिज मुशर्रफ मौलाना अतीक हाफिज अयूब मौलाना हसन रजा मौलाना इब्राहिम रजा मौलाना आसिफ रजा मुफ्ती इस्माईल मौलाना सुल्तान रजा मौलाना रियाज मौलाना यूनुस व समस्त आकोला सुन्नी यूथ फोर्स चे पदाधिकारी उपस्थित होते.