अकोट (प्रतिनिधी) : अकोट तालुक्यातील रेती माफियांनी वडाळी देशमुख येथील पठार नदी पात्रावरील शहापूर धरण पोखरुन त्यामध्ये ४० फूट सुरुंग खोदला आहे. त्याठिकाणी साठवून ठेवलेल्या रेतीच्या गंजीवरुन गस्तीवर असलेल्या पोलिसांना याचा शोध लागला. त्यांनी तत्काळ अकोट तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पाटबंधारे विभागाला माहिती दिली.
अकोटचे नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, शनिवारी तहसीलदारांनीही घटनास्थळी पाहणी केली असून पंचनामा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना दिल्याचे समजते. पणज गावाजवळून वाहणाऱ्या पठार नदीवर लघु पाटबंधारे विभागाचे शहापूर हे धरण बांधलेले आहे. या धरणात पाणीसाठा कमी असल्याने व गाळ असल्याने रेती माफियांनी धरण पात्रात अक्षरशः २० ते ३० फूट खोल सुरुंग तयार करुन रेती उपसा करण्याचा सपाटा लावला आहे. या सुरुंगातून रेती काढून ती गाळून त्याची अवैध वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे रेती काढण्यासाठी पायऱ्या ही तयार केलेल्या होत्या. हे सुरुंग धरणाच्या भिंतीपर्यंत खोदलेले आहे. रेती माफियांनी चक्क धरणाचे पात्र व आजूबाजूला पूर्णपणे खोदून ठेवले आहे. रात्री येथून रेती उपसा व वाहतूक होत होती.
रात्री गस्तीवर असलेले अकोट ग्रामीणचे ठाणेदार मिलिंद कुमार बहकार यांना धरणाजवळ रेतीचे ढीग दिसले. त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. याची माहिती त्यांनी तहसीलदार विश्वनाथ घुगे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर येथे नायब तहसीलदार यानी भेट दिली. सुरुंगाची पाहणी केल्यानंतर रेती माफियांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
अधिक वाचा : अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी वकिलांची मागितली माफी, वकील संघाने घेतला बहिष्कार मागे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola