• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निधी परत गेल्यास कठोर कारवाई : महापौर विजय अग्रवाल

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 19, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
निधी परत गेल्यास कठोर कारवाई : विजय अग्रवाल
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : सन २०१७-१८ अंतर्गत प्राप्त नगरोत्थान, दलितेतर व दलित वस्ती निधी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे तातडीने करण्यात यावेत. या कामांकरिता मिळालेला निधी परत गेल्यास संबंधीतावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर विजय अग्रवाल यांनी दिला.

नगरोत्थान, दलितेतर व दलित वस्ती निधी अंतर्गत सुरु असलेल्या कामाची निविदा तसेच प्रगती पथावरील कामांचा गुरुवारी (ता. १५) महापौर विजय अग्रवाल यांनी आढावा घेतला. मनपाच्या स्थायी समिती सभागृह येथे आयोजित बैठकीमध्ये शहर अभियंता सुरेश हुंगे, नगरसेवक अमोल गोगे, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, उपअभियंता श्री. टापरे, श्री. गोंडाणे, श्री. शिरसाट यांच्यासह जलप्रदाय विभाग, बांधकाम व विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी सन २०१८-१९ अंतर्गत नगरोत्थान व दलितेत्तर निधीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सन 2018-19 प्राप्त दलित वस्तीची कामे संबंधीत नगरसेवकांकडून घेउन यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना दिले. शासनाने एल.ई.डी. पथदिव्यांच्या संदर्भात ई.ई.एस.एस.कंपनीशी करार केल्यामुळे एल.ई.डी. पथदिव्यांची कामे दलित वस्ती निधी अंतर्गत घेउ नये असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

हद्दवाढी भागामध्ये महाराष्ट्र शासनाकडून अकोला महानगरपालिकेला 96.30 कोटींची कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हद्दवाढी भागातील कामांची निविदा सुध्दा तातडीने काढण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. सदर निविदा २१ नोव्‍हेंबरपर्यंत प्रकाशित करण्यात यावी असेही त्यांनी निर्देशित केले. हद्दवाढी भागातील कामांचे वर्गीकरण ज्यामध्ये बांधकाम विषयक, विद्युत व पाणी पुरवठा विषयक कामे अशा प्रभागनिहाय वेगवेगळ्या कामांची एकत्रित कामांची निविदा काढण्यात यावी अशा सुचना महापौर विजय अग्रवाल यांनी केल्या.

जलप्रदाय विभागामार्फत जलकुंभनिहाय असलेल्या लिकेज दुरुस्तींच्या कामांचीसुध्दा तपासणी करणे व लिकेजचे कामे तातडीने करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देशित केले. संबंधीत अभियंता सूचना केल्यावरच कार्यवाही करत असल्याची तक्रार असल्याने तसे होता कामा नये. तसेच रस्त्यावर पाणी येऊन पाण्याचा अपव्यव होउन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश उपमहापौर वैशाली शेळके यांनी दिले.

कंत्राटदारांची असलेली प्रलंबित देयके त्यांनी कामे केलेली असल्यामुळे अदा करण्यात यावी असे निर्देश महापौरांनी दिले. ज्या कामांचे विविध निधी अंतर्गत कामाचे आदेश होउन कामे बंद आहेत अशा कामांचा झोननिहाय तक्ता तयार करुन कामांचे नियोजन करुन कामे तातडीने पुर्ण करण्याचेही महापौर विजय अग्रवाल यांनी निर्देशित केले. कोणत्याही कामांना विलंब होउ नये तसेच संपूर्ण कामांची जबाबदारी निश्चित करुन कामे प्रलंबित झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागांतर्गत प्रकाशित झालेल्या निविदांसंदर्भात कामांचे आदेश तातडीने देण्याबाबत सूचना महापौर विजय अग्रवाल यांनी केल्या.

अधिक वाचा : अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaAkola municipal corporationAkola news in MarathiVijay agrawalअकोला महानगरपालिका
Previous Post

टी-२० मध्ये मिताली राज च्या सर्वाधिक धावा

Next Post

अकोला महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

अकोला महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन

अकोट तालुक्यातील रेती माफियांनी खोदला ४० फूट सुरुंग, रेतीची चोरी

अकोट तालुक्यातील रेती माफियांनी खोदला ४० फूट सुरुंग, रेतीची चोरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.