तामिळनाडू किनारपट्टी प्रदेशात गाजा चक्रीवादाळाने धुमाकूळ घातला असून जवळपास ८० हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री १ वाजून ४० मिनिटांनी या चक्रीवादळामुळे नागापट्टनम येथे भूस्खलन झाले. यावेळी वार्याचा वेग ९० ते १०० किलोमीटर प्रतितास एवढा होता. यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
बंगालच्या उपसागरात गाजा उठलेले चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीवर येऊन धडकले. या वादळामुळे लाखो लोक प्रभावित झाले असून प्रशासनान त्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क आहे. शुक्रवारी रात्री वादळाचा बळी ठरलेल्या ११ जणांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी १० लाखांचा मोबदला देण्याची घोषणा केली आहे. तर गंभीर जखमींना १ लाख आणि जखमींना २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
चक्रीवादळ प्रभावित जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. नागापट्टनम जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे. एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात येत आहे. तसेच आणखी ३१ हजार जवानांना बचावकार्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पलानीसामी यांनी सांगितले की, ८१ हजार ९४८ जणांना ४७१ मदत केंद्रात हालवण्यात आले आहे. मदतकार्य सुरू असून आपण स्वत: चक्रीवादळ प्रभावित भागाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : पैसे थकवल्याने फॅशन डिझायनरची हत्या; 3 संशयितांना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola