राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. दौसा लोकसभा मतदारसंघातील खासदार हरीश मीणा यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट आणि सचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत मीणा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
संपूर्ण देश काँग्रेस सोबत येत आहे. भाजप केवळ राम मंदिराची चर्चा करत आहे. केवळ अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष चालवत आहेत. मीणा यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढल्याचे, अशोक गहलोत म्हणाले. निवडणुकीसाठी पक्ष तयार असून मी स्वत: आणि सचिन पायलट दोघेही विधानसभा निवडणुका लढवणार आहोत, असे त्यांनी स्षप्ट केले. मात्र ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे मात्र गहलोत यांनी सांगितले नाही.
मीणा यांचा काँग्रेसमधील प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. याशिवाय नागौर मतदारसंघातील भाजपचे आमदार हबीब उर रहमान हे देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याने ते नाराज असल्याचे कळते.
माजी डीजीपी हरीश मीणा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मीणा यांचे बंधू नमो नारायण मीणा हे काँग्रेसचे नेते आहेत. राजस्थानमध्ये मीणा समाजाचा मोठा प्रभाव आहे. पूर्व राजस्थानमध्ये या समाजाकडे महत्त्वाचे मतदार म्हणून पाहिले जाते. राजस्थान पोलिस दलाचे प्रमुख म्हणून मीणा यांनी 2009 ते 2013 या काळात काम पाहिले आहे.
अधिक वाचा : नेहरुंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला : शशी थरूर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola