अकोला (शब्बीर खान) : अकोला सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जठारपेठ आखाडा परिसरातील एका ७० वर्षाच्या म्हाताफ्याने चार वर्षांच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना रविवार, ११नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून जठारपेठ आखाडा परिसरातील एका ७० वर्षीय म्हाताऱ्याने आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबातील चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. या चिमुकलीची प्रकृती बिघडल्यानंतर ही बाब समोर आली आहे. सध्या या चिमुकलीवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी कलम ३७६ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी यादवराव डोंगर यास अटक केली आहे.
अधिक वाचा : दगडाने ठेचून पत्नीची हत्या; पतीस अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola