मुंबई : तडजोडीचे राजकारण सुरूच राहील परंतु आंबेडकरी राजकीय पक्षांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे हा विचार देऊन त्यावर काम करायला झोकून देणारा खऱ्या अर्थाने ”डोळस” असा सहकारी होता अविनाश या शब्दात भारिप नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त करून निर्णायक क्षणी सहकारी जाणे हे मोठे नुकसान असते अशी प्रतिक्रिया दिली.
१९७६-७७ च्या काळात अविनाश डोळस आणि माझा परिचय झाला,नामांतर आंदोलनात अविनाश काम करीत होते,जे करायचे ते एकदम झोकून ही त्याची काम करण्याची पद्धत होती,त्याकाळात औरंगाबाद मध्ये दलित थिएटर जोमात चालवणाऱ्या महत्वाच्या कार्यकर्त्यांत अविनाश आघाडीवर होते. ”रामराज्य येत आहे” ही एकांकिका त्याकाळी खूप गाजली होती तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते त्यामागे अविनाश डोळस यांच्या सारखा कलावंत होता अशी आठवण ऍड आंबेडकर यांनी ”लोकजागर” शी बोकताना सांगितली.
आंबेडकरी चळवळ असो की राजकारण त्याला स्वाभिमानाची जोड असायला हवी या माझ्या भूमिकेला अविनाश यांनी सर्वप्रथम पाठिंबा देऊन गेली तीन चार दशके बौद्धिक पाठबळ प्रदान करण्यात मोलाची भूमिका अदा केली असे आंबेडकर म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य संपदा प्रकाशित करण्यात वेगवान प्रक्रिया सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता हे विसरून चालणार नाही याची त्यांनी आठवण करून दिली.
भारिप-बहुजन महासंघात सद्या ते प्रदेश प्रवक्ता म्हणून कार्यरत असले तरी संघटन,कार्यशाळा,वक्तृत्व आणि नेतृत्व प्रशिक्षण यावर भर असणाऱ्या डोळस यांनी आमच्या चळवळीला व्यापक बौद्धिक आधार मिळवून देण्याचे कार्य केले आहे असेही ऍड आंबेडकर म्हणाले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola