गुजरात : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या असे केल्यानंतर आता गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव बदलण्याची तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव ‘कर्णावती’ असे करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. गांधीनगर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी अहमादाबादचे नाव बदलणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. यासाठीची कायदेशीर प्रक्रिया बाकी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहमादाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. आम्हाला लोकांकडून जर या नावासाठी पाठिंबा मिळाला तर आम्ही कायदेशीर अडथळे पार करून अहमदाबादचे नाव नक्की बदलू असेही नितीन पटेल यांनी म्हटलं आहे. अहमदाबादचे ११ व्या शतकातले नाव अशावल असे होते. अनिल्वराचा चालुक्य राजा कर्ण याने अशावलच्या भिल्ल राजाविरोधात लढाई जिंकली ज्यानंतर त्याने अशावलचे नाव बदलून कर्णावती असे ठेवले. त्याच नावाची आठवण म्हणून अहमदाबादचे नावही कर्णावती असे ठेवणार असल्याचे नितीन पटेल यांनी म्हटले आहे.
कर्णावतीचे नाव अहमद शाह या सुलतानाने बदलून अहमदाबाद असे ठेवले होते. मात्र आम्ही हे नाव बदलण्याचा विचार करतो आहोत असेही पटेल यांनी म्हटले आहे. नितीन पटेल यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते मनिष दोशी यांनी टीका केली आहे. मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपाकडून शहरांची नावं बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही असेही दोशी यांनी म्हटले आहे. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे अशीही टीका दोशी यांनी केली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola