पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी देशाबाहेर पळाले. अशात ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक केली आहे. कोलकाता विमातळावरून दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. हाँगकाँगहून दीपक कुलकर्णी परतला होता तो कोलकाता विमानतळावर येताच त्याला ईडीने अटक केली.Prevention of Money Laundering Act अन्वये दीपक कुलकर्णीला अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येईल असे ईडीने म्हटले आहे. दीपक कुलकर्णीची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबईला आणण्यात येईल कारण यासंदर्भातली तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीच्या विविध व्यवसायांशी दीपक कुलकर्णी संबंधित आहे. तसेच कर्ज बुडवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी तो एक आहे असेही ईडीने म्हटले आहे.
दीपक कुलकर्णी हाँगकाँग मध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्सीशी संबंधित आहे असेही समजते आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola