नवी दिल्ली : तुम्ही जर बारावी पास आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया (AAI) ने निवेदन जारी करून 12 वी उत्तीर्ण असलेल्यांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या फायर सर्व्हिसमध्ये ही भरती होणार आहे. डिप्लोमा इन मॅकेनिकल/ ऑटोमोबाईल/ फायर ची पदवी घेणाऱ्या उमेदवारांना 50 टक्क्याहून अधिक गुण तसेच बारावी पास असणे अपेक्षीत आहे. त्यामुळे पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकता.
AAI ने या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एएआयची अधिकृत वेबसाईट aai.aero वर माहिती मिळू शकते. 5 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड झालेल्यांना 12 हजार 500 ते 28 हजार 500 पर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा असणं गरजेचे आहे. इच्छुक उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेच आहे. जाहिरात जारी होण्याआधी किमान एक वर्ष आधीच हे लायसन्स असावं.
अधिक वाचा : शिक्षक-शिक्षकेतरांची होणार भरती; सरकार ४,७३८ पदे भरणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola