छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये बेमतरा जिल्ह्याच्या साजा विधानसभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. काँग्रेस उमेदवार रविंद्र चौबे यांच्या समर्थनार्थ भाषण दिल्यामुळे चक्क एका युवा काँग्रेसचा स्थानिक नेता राहुल दानी याची जीभ कापण्यात आली आहे. जीभ कापली गेल्यामुळे राहुलला गंभीर अवस्थेमध्ये भिलाईच्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे राहुलची सर्जरी करण्यात आली आहे. पण या सगळ्या धक्कादायक घटनेनंतर राहुल कोमामध्ये गेला आहे.
निवडणुकांच्या सभेदरम्यान युवा काँग्रेस नेत्याला भाषण देणं चांगलच महागात पडलं आहे. ही घटना 31 ऑक्टोबरची आहे. जेव्हा धमधामध्ये युवा काँग्रेस कार्यकर्ता संमेलनात भाषण केल्यानंतर राहुल दानी जेवण करण्यासाठी जात होते. त्यात अज्ञातांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांना गाडीबाहेर काढत, त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर जीभ कापून रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत फेकून निघून गेले.
या मारहाणीनंतर त्यांना तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही अज्ञात आले. मला मारहाण केली आणि मरणासन्न अवस्थेत मला फेकून गेल्याची कबुली रोहुल यांनी पोलिसांना दिली आहे. तीन दिन कोमामध्ये राहिल्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास राहुल यांना जाग आली आहे.
अधिक वाचा : अंबरनाथमध्ये केमिकलच्या कंपनीत भीषण आग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola