मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला ‘2.0’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून VFXची किमया या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटाचा हा सिक्वल असून यामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या si-fi म्हणजेच सायन्स आणि फिक्शन चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून अॅक्शनसुद्धा पाहायला मिळणार आहे. ‘2.0’च्या माध्यमातून अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
टेलिकॉम कंपन्यांचा सूड घेण्यासाठी डॉ. रिचर्ड संपूर्ण शहरातील लोकांकडून मोबाइल हिसकावून घेतो असं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी तब्बल एक लाख मोबाइल्सचा वापर करण्यात आला.
अधिक वाचा : ‘झिरो’ सिनेमाचं ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola