नवी दिल्ली: ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातल्या बहुप्रतीक्षीत अशा मंझूर- ए- खुदा गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्यातून सर्वात सुंदर ठग म्हणजेच सुरैया जानची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. आमिरनं काही दिवसांपूर्वी सुरैया जान ही इतर ठग्जमधली सर्वात सुंदर ठग असल्याचं कौतुक केलं होतं. त्यामुळे कतरिनानं साकारलेल्या सुरैया जानची एक झलक पाहण्याचं कुतूहल तिच्या चाहत्यांना होतं.चित्रपटातील निर्णायक टप्पा गाण्याच्या दरम्यान दाखवण्यात येणार आहे. म्हणूनच या गाण्याचे बोल ‘मंझूर- ए- खुदा’ असं ठेवण्यात आले आहे. सुनीधी चौहान, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंगनं हे गाणं गायलं असून प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.
‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा : अभिनेते अनुपम खेर यांचा FTII च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola