जकार्ता : इंडोनेशियामधील लायन एअरलाईन्सचे देशांतर्गत पँसेंजर बोईंग विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १३ मिनीटांमध्ये समुद्रात कोसळल्याने जगभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार त्या समुद्रात कोसळलेल्या विमानामध्ये १८८ प्रवासी होते. या दुर्घटनाग्रस्त विमानाचा पायलट दिल्लीकर भाव्य सुनेजा असल्याची माहिती समोर आली आहे.
बोईंग ७३७ मॅक्स ८ हे विमान २१० प्रवाशांना घेऊन जकार्ताहून सुमात्रा बेटावरील पांगकल पिनाग या शहराकडे जात असताना अपघात झाला. बोईंग ७३७ मॅक्स विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १३ मिनीटांमध्ये संपर्क तुटला. विमानातील प्रवाशांची आम्हाला काही माहिती नाही, असे लायन एअरलाईन्सचे प्रमुख महंमद स्यायुगी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. विमानामधील काही अवशेष मिळाल्याचे ते म्हणाले. बचावकार्यासाठी व्हेसल्स तसेच हेलिकॉप्टर पाण्यावरून गस्त घालत आहेत, अवशेष शोधण्यासाठी आम्ही अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करत आहोत असे त्यांनी नमूद केले.
सूनेजा २०११ पासून लायन एअरलाईन्समध्ये कार्यरत
राजधानी दिल्लीमधील मयूर विहारचा निवासी असणाऱ्या सुनेजाने २००५ मध्ये अल्कोन पब्लिक स्कुलमधून उर्तीर्ण झाला. सुनेजा २०११ साली लायन एअरलाईन्समध्ये रुजू झाला. सुनेजा बोईंग ७३७ मॅक्स विमानाचा पायलट होता. तो मायदेशी परतण्याबाबत विचार करत होता. भारतीय एअरलाईन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुनेजाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आम्ही त्याच्याशी जुलै महिन्यामध्ये बोललो होतो. बोईंग ७३७ मॅक्स विमानाचा पायलट असलेल्या सुनेजाचा आतापर्यंतचा प्रवास निर्दोष होता. त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता आम्ही त्याला रुजू करून घेण्यास उत्सुक होतो. सुनेजा दिल्लीचा असल्याने त्याला दिल्लीमध्येच पोस्टींग हवे होते. त्याचबरोबर तो भारतीय लायसन्स मिळविण्याच्या प्रयत्नात होता.
सुनेजासह विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असतील यासाठी आम्ही सर्व प्रार्थना करत आहोत असे हा अधिकारी म्हणाला. ३१ वर्षीय सुनेजाला बेल एअर इंटरनॅशनलकडून पायलटचा परवाना २००९ मध्ये मिळाल्याचे त्याच्या प्रोफाईलवरून दिसून येते. त्यानंतर त्याने एमिरात एअरलाईन्समध्ये ट्रेनी पायलट म्हणून सप्टेंबर २०१० मध्ये व्यावसायिक कारर्किदीला 0प्रारंभ केला. त्यानंतर चार महिन्यात त्याने लायन एअरलाईन्समध्ये रुजू झाला.
अधिक वाचा : इंडोनेशियात सर्वात मोठा विमान अपघात: जकार्ताहून १८८ प्रवासी घेऊन निघालेले विमान समुद्रात कोसळले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola