अकोट : डेंग्यू,मलेरिया यांसारखे अनेक गंभीर आजार केवळ डासांमुळे होत असतात.अकोट शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीमुळे,पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० कार्यक्षेत्रात ८ ते १० डेंग्यू सदृश्य संशयित रुग्ण आढळलेले आहेत.त्यापैकी सनी सराटे,वैभव कोरडे,भगत काका,पार्थ जोशी,अमृता इंगळे असे ५ रुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह आहेत.
शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि इतर खाजगी रुग्णालयातुन तसेच जनतेतून ही माहिती प्राप्त झाली आहे.सर्वसामान्य गोरगरीब जनता यामुळे त्रस्त झाली आहे परंतु नगरपालिका व शासन अजूनपर्यंत याप्रकरणी गाढ झोपीत आहे.नगरपालिका आरोग्य विभागाला याची पुर्णतः कल्पना असूनही ते मात्र झोपेचं सोंग घेऊन आहेत.ही परिस्थिती आपल्या शहरात नवीन नाही दरवर्षी अश्याप्रकारच्या समस्या उद्भवत असतात.त्यासंदर्भात दरवर्षी वेळोवेळी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व नगरसेविका विजयाताई बोचे हे अश्या प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी साठी पाठपुरावा करत असतात.परंतु यावर नगरपालिका आरोग्य विभाग कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना त करतच नाही पण साधं डास औषध सुद्धा फवारत नाही.
यावर्षी सुद्धा डेंग्यूची लागण झाल्याच्या अनेक तक्रारी नगरसेविका विजयाताई बोचे यांच्या कडे प्राप्त होत आहेत याबाबत नगरसेवीका अधिकाऱ्यांना जी वेळोवेळी माहिती देतात त्यावर तातडीने उपाययोजना अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे संपूर्ण शहरभर सातत्याने फवारणी,र्फाॅगिंग करावे.डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी द्यावे.परंतु काहीही उपाययोजना नगरपालिका प्रशासन करत नाहीत म्हणून नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दरवर्षी प्रभाग क्रं.१० व परिसरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व नगरसेविका विजयाताई बोचे अश्या परिस्थितीत स्वखर्चाने डास औषध फवारणी सतत १० दिवस करत असतात.त्यामध्ये आज या समाजहिताच्या उपक्रमास सुरवात केली.यावेळी त्र्यंबकराव काळमेघ, गजानन मांजरीकर, विश्वासराव वसू, अतुल पांडे, सागर हागे, कपिल वानखडे, वैभव कोरडे, सनी सराटे, शाम मालठाणे, अजय सराटे, संजय भट्टी, अनिकेत बिजागिरे, सोनू सोलंके, रवी बिजागिरे, जय सातपुते, गौरव कोरडे, सुभाष सुरत्ने इत्यादी सह सर्व प्रभागातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा : महिलेला शरीर सुखाची मागणी करणारा मुख्याध्यापक गजाआड ; सोमवार पर्यत पोलीस कोठडी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola