नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर आता संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्यांना सक्तीची रजा देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या स्वर्णश्री राव राजशेखर यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जावं लागलं असून त्यांच्याजागी प्रभारी प्रवक्ते म्हणून कर्नल अमन आनंद हे कामकाज पाहणार आहेत.माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांनी ‘खरे तर, सैनिक नसलेल्या व्यक्तीकडून सैन्याच्या चिन्हाचा दुरुपयोग होणं गुन्हा नाही.
पण ‘जीओसी इन सी’चा आर्थिक सल्लागार असलेल्या अशा व्यक्तीला फटकारले पाहिजे.’ असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना स्वर्णश्री यांनी हे ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून विशेष अधिकाऱ्याच्या होत असलेल्या दुरुपयोगाबाबत टीका केली होती. ‘अधिकारी आपल्या घरी जवानांना राबवतात. त्यावर तुमचं मत काय आहे? अधिकाऱ्यांच्या मुलांना शाळेतून ने-आण करण्याचं काम जवान करतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सरकारी गाड्यांमधून अधिकाऱ्यांच्या पत्नी शॉपिंगला जातात हे कसं विसरता येईल? आणि वारंवार होणाऱ्या पार्ट्यांचा खर्च कोण करतं?’ असे प्रश्न त्यांनी ट्विटमधून विचारले होते. त्यावरून प्रचंड वाद झाला होता. अशा प्रवक्त्यांना सैन्य दलात ठेवणं हा जवानांचा अपमान असून त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली होती. सेवानिवृत्त मार्शल मनमोहन बहादूर यांनीही या ट्विटचा निषेध नोंदवला होता. तर भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त करून त्याच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई केली असून संबंधित ट्विटही काढून टाकण्यात आलं आहे.
अधिक वाचा : दिवाळीत आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola