राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळी दुष्टचक्राच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची आस आता दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांना लागली आहे. राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई निवारणासाठी सरकारमार्फत जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकºयांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पावसातील खंड, भूजल पातळी,जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याच्या पृष्ठभूमीवर, पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची प्रतीक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या १८० तालुक्यांमध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील २७ तालुक्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती फायदेशीर – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola