‘हाऊसफुल्ल- 4’ या चित्रपटामागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. अभिनेता नाना पाटेकर व दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी या चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या शूटींगच्या वेळी आणखी एक धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री सेटवर घडला. सेटवर गाण्याचे शूटींग सुरू असताना तिथे जबरदस्ती घुसलेल्या सहा जणांनी महिला डान्सरची छेड काढली. याप्रकरणी गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास जवळपास 100 डान्सरनी आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
गुरुवारी मुंबईतील चित्रकुट स्टुडिओमध्ये हाऊसफुल्ल-4 चे शूटींग सुरू होते. सेटवर अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख देखील उपस्थित होते. त्यावेळी अचानक सहा तरुण जबरदस्तीने सेटवर घुसले व त्यांनी एका महिला डान्सरची छेड काढायला सुरुवात केली. यावेळी इतर महिला डान्सरनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यांचा देखील विनयभंग केला. त्यानंतर सर्व डान्सरनी याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. छेड काढणाऱ्यांमधील दोघांची ओळख पटली असून पवन शेट्टी व सागर अशी त्या दोघांची नावे आहेत.
हाऊसफुल्ल-4 या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटींग पार पडले आहे. याच दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला तसेच या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवर देखील अशाच प्रकारचे आरोप काही महिलांनी केले. त्यानंतर या दोघांनीही हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख, क्रिती सेनॉन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अधिक वाचा : सनी देओलच्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola